आशीष अम्बाडे, झी मीडिया,चंद्रपूर : महाराष्ट्रातील (Maharashtra News) हा जिल्ह्या पुन्हा एका चर्चेत आला आहे. सोन्यापाठोपाठ या जिल्ह्यातील गावात हिऱ्याची खाण (Diamond Mine) सापडल्याने सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याची खाण चर्चेत आल्यानंतर आता हिऱ्याचा खाण...या जिल्ह्यातील घोडेवाही गावात हिऱ्याची खाण असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. 


घरातील चुलीखाली सापडली खाण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धक्कादायक गोष्ट म्हणजे ही खाण कुठल्या मैदानात, डोंगळ भागात नाही तर चक्क एका घरात सापडली आहे. एवढं नाही तर जागा ऐकून तर तुमची हवाच गुल होईल. कारण ही खाण महिलांच्या राज्य असलेल्या स्वंयपाक घरातील चुलीच्या खाली सापडली आहे. ही घटना घोडेवाही गावातील ज्ञानेश्वर तीवाडे यांच्या घरी घडली आहे. ही घटना जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर ग्रामपंचायत खाणीचे उत्खनन करण्यासाठी पुढे सरसावली आहे. (diamond mine was found in a house in Chandrapur district of Maharashtra trending)


चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील घोडेवाही आणि पाथरी इथे 1997-98 साली भूगर्भ वैज्ञानिकांनी संशोधन केलं होतं. त्यावेळी सुमारे पाच कि.मी.च्या परिसरात हिऱ्यांचा साठा असल्याचं संशोधकांनी ग्रामस्थांना सांगितलं होतं. सुमारे दीड महिना संशोधकांनी गावात ठाण मांडलं होतं. गावाचा भूगर्भात हिऱ्याची खाण असल्याची चर्चा पंचक्रोशीत रंगली. जमिनीचे भावही वधारले होते. या संशोधनाला पंचवीस वर्षाच्या काळ उलटला. मात्र हिरे बाहेर काढण्यासाठी कुठलीच हालचाल झालेले नाही. 




दरम्यान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार 15 व्या शतकापासून वैरागड ,गडचिरोली परिसरात हिरे आढळले होते. इंग्रजांनी पण इथे उत्खनन केले.पण मुबलक हिरे आढळले नाहीत.