पिंपरी चिंचवड : तीन मुलांची हत्या करून आईने आत्महत्या केल्याच्या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानं नैराश्यामध्ये आईनं तीनही मुलांची हत्या करत आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. तीन मुलांची हत्या करुन आईची आत्महत्या यामुळे पिंपरी-चिंचवडमधलं भोसरी हादरुन गेलं होतं. आर्थिक नैराश्यातून एका महिलेनं तिच्या ६ वर्षाचा मुलगा, ७ आणि ९ वर्षाच्या मुलींची हत्या करुन आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. पण शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक गोष्ट उघड झालीय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. एवढंच नाही तर तीनही मुलांची हत्या गळा दाबून करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना दोरी बांधून अडकवण्यात आल्याचं दिसतं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आईवर हत्या तर वडिलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.