महाराष्ट्र दिन! शेतकऱ्यांसाठी डिजिटल स्वाक्षरी सातबारा
कमी वेळेत, कमी श्रमात शेतकऱ्यांना सातबारा उपलब्ध करण्याचा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताचा आहे.
मुंबई : शेतकरी आणि जमीन मालकांसाठी आता आनंदाची बातमी. आजपासून संकेतस्थळावर उपलब्ध होणारा डिजिटल स्वाक्षरी सातबारा सर्व शासकीय आणि निमशासकीय कामासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यासाठी या संगणकीय सातबाऱ्यावर तलाठ्याच्या स्वाक्षरीची आवश्यकता नाही. कमी वेळेत, कमी श्रमात शेतकऱ्यांना सातबारा उपलब्ध करण्याचा हा उपक्रम शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. राज्यात ४३ हजार ९४८ महसुली गावे आहेत. त्यापैकी ४० हजार महसुली गावांचे सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी २५० तालुक्यातील १०० टक्के गावांचे सातबाराचे काम पूर्ण झाले आहे.
३० हजार शेतकऱ्यांना फायदा
अशा ३० हजार शेतकऱ्यांना डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उपलब्ध होणार आहे. तलाठी, मंडळ अधिकारी आणि सर्व महसूल अधिकारी यांनी अहोरात्र संगणकीकरणाचे काम करुन सातबारा आणि खाते उतारा तयार करण्याचे काम केले आहे.