दिनेश सोनवणे यांनी दिले ४ जणांना जीवदान, अवयव प्रत्यारोपण चळवळही अनलॉक
लॉकडाऊनमध्ये अडकलेली अवयव प्रत्यारोपणची चळवळही आज अनलॉक झाली.
नागपूर : कोविडच्या दुसऱ्या लाटेतून नागपूर जिल्हा पूर्वपदावर येत असताना आज लॉकडाऊनमध्ये अडकलेली अवयव प्रत्यारोपणची चळवळही आज अनलॉक झाली. दिनेश सोनावणे ( वय -50) हे ब्रेन स्ट्रोकमुळं मृत्यू दारात असताना त्यांनी अवयवदान केलं. सोनावणे कुटुंबियांनी पुढाकारा घेत व संमतीनंतर दिनेश सोनावणे यांच्या अवयव दानामुळं अवयवांच्या प्रतिक्षेत असलेल्या चार जणांना जीवनदान मिळालं.
दिनेश सोनावणे यांच्या अवयव दानात उपलब्ध झालेले हृदय मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयाकडे तर यकृत नागपुरातील मेडिट्रिना रुग्णालयात आणि दोन मूत्रपिंडांपैकी एक वर्धा येथील सावंगी मेघे येथे तर दुसरी नागपुरातील दुसरी न्यू इरा रुग्णालयात ग्रीन कॉरिडॉरमार्फत पोहचवत प्रत्योरीपत करण्यात आलं.
दिनेश सोनावणे यांचा बुटीबोरी येथे फोटो स्टुडिओ आहे. ते ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यूच्या दारात पोहचले होते. ते अखेरचा श्वास घेताना अवयवदान करण्यास त्यांच्या कुटुंबियांनी सहमती दर्शवली. त्यामुळं अवयव निकामी झालेल्या चौघांना जीवदान मिळालं आहे.
कोरोनाच्या दुस-या लाटेतून बाहेर आल्यानंतर नागपुरातील हे पहिलं यशस्वी अवयव दान आहे. याकरता दोन ग्रीन कॅरिरेडोअर बनवण्यात आले होते. पहिल्या ग्रीन कॅरिडोअरमध्ये मुंबईकरता मेडिट्रीना ते नागपूर विमानतळापर्यंतचा ग्रीन कॅरिडोअर होता. त्याअंतर्गत हे अंतर 4 मिनिटात नागपूरात पूर्ण झालं. तर नागपूर ते वर्धा असं दुसर ग्रीन कॅरिडोअर कऱण्यात आलं. या वर्षातील हे पाचवे अवयव दान आहे.