साहित्य संमेलन म्हटलं की, What the F*** फिलिंग येते- सचिन कुंडलकर
जाणून घ्या त्यांनी नेमकं लिहिलंय तरी काय.....
मुंबई : सर्वत्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातच्या नवनिर्वाचित अध्यक्षांच्या नावाची चर्चा सुरु असताना चित्रपट दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी अनेकांचच लक्ष वेधलं आहे.
सोशल मीडियावर साहित्य संमेलनाविषयी एक पोस्ट लिहित त्यांनी या संपूर्ण कार्यक्रमावर खरमरीत टीका केली आहे.
'मराठी साहित्य संमेलनासारख्या २००० वर्षे आउटडेटेड आणि खर्चिक टाईमपास कार्यक्रमाला परिचयाची किंवा परिसरातील व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडून आली कि केस काळे करावेत , दारू सोडावी , व्यायाम सुरु करावा, दर सहा महिन्याने तपासण्या करून घ्याव्यात . आपले वय वाढले असल्याचे भयंकर लक्षण. what the f*** फिलिंग . कारण अशा ठिकाणी आपल्यापेक्षा १९० वर्षे मोठी आणि कधीच नावे न ऐकलेली माणसे पहायची सवय होती', असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
कुंडलकर यांनी केलेली ही पोस्ट पाहून त्यावर अनेकांनीच आपल्या प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.
एकरंदरच त्यांची पोस्ट आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहता आता येत्या काळात हे प्रकरण आणखी धुमसण्याची चिन्हं दिसत आहेत.
दरम्यान, रविवारी ९२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यपदी ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली.
यवतमाळ येथे पार पडणाऱ्या यंदाच्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी ढेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षरदी निवड झालेल्या त्या पाचव्या महिला ठरल्या आहेत.