Ajit Pawar Group MLA :  महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी काही दिवसांत सुरु होणार आहे.. निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलीय.. कुठे श्रेयवादावरून तर कुठे मतदारसंघावर दावा करत नेत्यांनी दंड थोटपटलेत.. त्यामुळे राज्यात निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापलंय...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीत श्रेयवादाची लढाई सुरू झालीय.. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात भाजपानं दंड थोपटलेत. मांजरी येथील उड्डाणपुलाच्या कामावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये जुंपलीय.. भाजपच्या पदाधिका-यांनी नामफलकाला काळं फासत विकासकामाचे श्रेय लाटताना डावलल्याचा आरोप केलाय.. तर महायुती धर्म फक्त भाजपने पाळायचा का?, असा संतप्त सवालही उपस्थित केलाय..


विकासकामात श्रेयवादाची कोणतीही लढाई नसून गैरसमजुतीतून हा प्रकार झाल्याचं चेतन तुपेंनी भाजपाचे आरोप फेटाळलेत..दुसरीकडे महाविकास आघाडीतही जागावाटपावरून दावे प्रतिदावे करण्यात येतायेत... धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु झालीय..


लोकसभेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना औसामधून 50 हजार पेक्षा अधिक मतांची आघाडी मिळालीय.. आणि काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील हे भाजपात गेल्यानं औसा मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा केलाय.. 
औसा आणि निलंगा विधानसभेत काँग्रेस पक्षाचा आमदार पाहिजे, असं  वक्तव्य काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी केल्यानं मविआत वाद होण्याचे संकेत दिसतायेत..


औसाच्या जागेवरून मविआत रस्सीखेच


औसा विधानसभा मतदारसंघावर 1999 आणि 2004 शिवसेना तर 2009 आणि 2014 मध्ये काँग्रेसचं वर्चस्व होतं.. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत भाजपचे अभिमन्यू पवार विजयी झाले होते.. सध्या बसवराज पाटील भाजपात गेल्यानं औसा मतदारसंघावर ठाकरेंच्या शिवसेनेनं दावा करत तयारी सुरू केली आहे..


औसामध्ये कामाची गती वाढवण्याच्या सुचना अमित देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात.. त्यामुळे अमित देशमुख यांच्या या भूमिकेमुळे औसा विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे..