सांगली : कोयना धरण क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कोयना धरणसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक अपेक्षित आहे. त्यामुळे कोयना धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 2 वाजेपासून 10 हजार 264 क्युसेस पाण्याचा विसर्ग चालू होता. त्यानंतर 5 वाजेपासून 25 हजार क्युसेस इतका विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांनी सतर्कतेचं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या कोयना धरण 99.00 टक्के भरले आहे. तर धोम धरण 90 टक्के, कन्हेर धरण 9 टक्के, उरमोडी धरण 86 टक्के, तारळी धरण 96 टक्के भरलं आहे. 


पावसाचा जोर असाच कायम राहिला तर धरणातून पाण्याच्या विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी काठच्या वाळावा, शिराळा, मिरज, पलूस तालुक्यातील तसेच महानगपालिका क्षेत्रातील नदी काठावरील व सखल भागातील नागरिकांनी सावध राहण्याचे आणि नदी पात्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.