PHOTO : वयाच्या 18 व्या वर्षी 95 किलो वजन, सलमानच्या एका वाक्याने बदलं आयुष्य, किस-इंटिमेट सीन न करता आज आहे अत्यंत श्रीमंत

Net Worth of Sonakshi Sinha : बॉलिवूडमध्ये किस-इंटिमेट सीनशिवाय या अभिनेत्रीने आतापर्यंत 35 चित्रपटात अभिनय करुन यशस्वी झाली आहे. आज ही अभिनेत्री अत्यंत श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Jun 09, 2024, 08:51 AM IST
1/7

वयाच्या 18 व्या वर्षी अभिनेत्रीचे वजन 95 किलो होते. पण सलमान खानच्या त्या एका अटीमुळे तिने 30 किलो वजन कमी केलं. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये बोल्ड स्टाइलमध्ये एन्ट्री घेतली. पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला. 

2/7

आम्ही बोलत आहोत, दंबग अभिनेत्री आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची लेक सोनाक्षी सिन्हाबद्दल. आज ती तिचा 37 वा वाढदिवस साजरा आहे. बॉलिवूडमध्ये किस-इंटिमेट सीनशिवाय तिने अनेक चित्रपटात काम केलंय. 

3/7

संजय लीला भन्साळीच्या हीरामंडीमुळे ती सध्या चर्चेत आहे. तर तिच्या पहिल्या चित्रपटाच्या एन्ट्रीची कहाणी खूप रंजक आहे. सलमान खाने सोनाक्षीसमोर मोठी अट ठेवली होती. अभिनेत्रीने एका शोमध्ये सांगितलं होतं की, सलमान खान माझ्याकडे आला आणि मला वजन कमी करण्यासाठी सांगितलं. कारण त्याला मला त्याच्या चित्रपटात कास्ट करायचं होतं. 

4/7

सोनाक्षी सिन्हा तिच्या मेहनतीच्या जोरावर करोडोंच्या संपत्तीची मालक बनली असून ती तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी 5 कोटी रुपये मानधन घेते. 

5/7

मीडिया रिपोर्टनुसार ती जाहिरातींमधूनही चांगले पैसे कमावते. तिची एकून संपत्ती सुमारे 80 ते 90 कोटींच्या घरात आहे. 

6/7

सोनाक्षीला कारची आवड असून तिच्याकडे ऑडीसोबत बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर, मिनी कूपर आणि मर्सिडीजसारख्या महागड्या ब्रँडच्या गाड्या आहेत. 

7/7

सोनाक्षीच्या मालमत्तेबद्दल बोलायचं झालं तर मुंबईत तिचं स्वतःचं 11.3 कोटी रुपयाचं आलिशान घर आहे. घराशिवाय मुंबई आणि इतर शहरांमध्येही तिने अनेक प्रॉपर्टी खरेदी केलीय.