Maharashtra Politics : शिंदे गट आणि ठाकरे गटातील (Shinde Group vs Thackeray Group) वाद आता नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात (Maharashta Winter Session) पाहिला मिळतोय. याचेच पडसाद आज विधान परिषेदत (Vidhan Parishad) उमटले. विधान परिषद उपसभापतींच्या दालनात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यात वाद रंगला. सत्तांतरानंतर पहिल्यांदा समोर आलेल्या शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांना उद्धव ठाकरे यांनी जाब विचारला. दीपक केसरकर विधान परिषदेतील कामकाजासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या दालनात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकरांना तुम्ही असे कसे काय इतके निर्दयीपणे वागू शकता ? असा प्रश्न विचारला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक केसरकर यांना विचारला जाब
आम्ही काय वाईट केलंय तुमचं ? आम्ही काय कमी दिलं तुम्हाला ? आमच्या चौकशा लावता ? कार्यालय ताब्यात घेता ? असा प्रश्नांचा भडीमार उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांच्यावर केला. मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालावर शिंदे गटाने दावा केला आहे. शिंदे गटाने काल मुंबई महापालिकेत घुसून राडा केला होता. यावरुन उद्धव ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंत गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलं जात आहे, यावरुनही उद्धव ठाकरे संतापले आहेत. 


उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंना टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे RSS कार्यालयात त्या कार्यालयाचा ताबा घ्यायला गेले होते का, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केलीय. तसंच एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) संघ मुख्यालयात येऊन गेल्यावर लिंबू टाचण्या पडल्यायत का, ते तपासा असा टोलाही त्यांनी लगावला. मुंबई महापालिकेतल्या (Mumbai Municipal Corporation) कार्यालयावरुन शिंदे आणि ठाकरे गट भिडले होते. त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी ही टीका केलीय. तसंच ज्यांच्यामध्ये हिंमत नसते, ते चोरतात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 


संजय राऊत यांचाही टोला
एकनाथ शिंदेंनी संघ मुख्यालयाला आज भेट दिली, त्यावरून खासदार संजय राऊत यांनी (Sanja Raut) जोरदार घणाघात केलाय. संघ विचारांचा रेशीम कीडा शिंदेंच्या रक्तात वळवळतोय, काही दिवसात सभागृहात शिंदे काळी टोपी, खाकी पॅन्टमध्ये दिसतील. पक्षांतर केलं, पण शिंदेंचं एवढ्या लवकर रक्तांतर होईल असं वाटलं नव्हतं म्हणत शिंदेंवर राऊतांनी निशाणा साधला.


हे ही वाचा : मुंबई महापालिकेतील राड्यानंतर ठाकरे गट आक्रमक, यशवंत जाधव यांच्या नावाला फासला लाल रंग


आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर
एकनाथ शिंदेंच्या रेशीमबागेतल्या भेटीवरुन राऊतांनी टीका केली. त्या टीकेला भाजपच्या आशिष शेलार यांनी (Ashish Shelar) जळजळीत प्रत्युत्तर दिलंय.. मुख्यमंत्री रेशीम बागेत गेले त्याचा त्रास श्रीमान संजय राऊत यांना झाला आणि त्यांनी सकाळी हिरवी उलटी केली. काँग्रेस, नवाब मलिक, अस्सलम शेख यांची संगत आणि याकूबच्या थडग्यावर रोषणाई करणाऱ्यांना असा त्रास, मळमळ, जळजळ होणारच अशी टीका शेलारांनी केलीय.