नाशिक : बलात्काराच्या आरोपाखाली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर आसारामच्या ट्रस्टच्या नाशिकमधल्या मालेगाव तालुक्यातल्या अंजन वडेल इथल्या आश्रमाच्या जमिनीचा वाद समोर आला आहे. मालेगाव तालुक्यातल्या वडेल शिवारात आसारामच्या ट्रस्टचा ३५ एकर जागेवर आश्रम आहे. यातली काही जमीन अजंग इथल्या संजय जाधव यांनी आश्रमाला दान दिली होती. गोशाळा आणि गुरुकुल उभारण्यासाठी ही जागा साधारण मुखत्यारपत्राद्वारे देण्यात आली होती. मात्र इथे कुठल्याही प्रकारची गोशाळा तसंच गुरुकुल उभारण्यात आलं नाही. 


उलट आश्रमाच्या नावानं या ठिकाणी गैरकृत्य सुरु होती असा आरोप, जमिनीचे मालक संजय जाधव यांनी केला आहे. आपली वडिलोपार्जित जमीन आपल्याला परत मिळावी अशी मागणी संजय जाधव यांनी केलीय.