औरंगाबाद : शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्यावरुन वाद निर्माण झालाय. शिवजयंती उत्सव समिती आणि पालिकेतील वादात मराठा क्रांती मोर्चाची उडी घेतली आहे. पालिकेत घुसून महापौर आणि प्रशासनाचा निषेध केला. त्यामुळे गोंधळ उडाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद शहरातील क्रांतीचौकातल्या शिवाजी महाराजाच्या पुतळ्याची उंची वाढवण्यावरून शिवजयंती उत्सव समिती आणि महानगर पालिकेत वाद पेटलाय. या वादामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि कार्यकर्त्यांनी उडी घेतल्यानं हा वाद चिघळण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपासून महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी होत असताना महानगर पालिका कोणतेही पाउल टाकत नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला. 


या कार्यकर्त्यांनी थेट महापालिकेत घुसून जोरदार घोषणाबाजी करत महापौर आणि प्रशासनाचा निषेध केला. महापालिकेला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ऊंची वाढवण्यासाठी पैसे नसतील तर मराठा क्रांती मोर्चाला केवळ एनओसी द्या. आम्ही काम करू, अशी मागणीही मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केलीय. 


येत्या १९ फेब्रुवारीला जर कामाचा शुभारंभ महापालिकेनी केला नाही. तर आम्ही करू असा अल्तीमेटही त्यांनी दिलाय. गेल्या ५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या नेत्यांनी पुतळ्याची ऊंची वाढू दिली नसल्याचाही आरोप केल्यानं पुतळ्याचा वाद आता विकोपाला जाण्याची शक्यता आहे.