नागपूर : पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना (Flood Infected Farmers) आज मदतीचा पहिला टप्पा म्हणून २ हजार २९७ कोटी वितरीत केले. तर ४ हजार ७०० कोटी आम्ही दिवाळीनंतर (Diwali 2020)  देऊ असे मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी म्हटलंय.  पुरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना देत असलेल्या मदतीसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांना निधी वितरीत केल्याचे ते म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही निधी देण्याची तयारी केली होती मात्र आचारसंहिता लागली. कुठे आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी आम्ही पत्र लिहले होते असे वडेट्टीवार म्हणाले. परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी १० हजार कोटींच्या पॅकेजमधील ५६६ कोटी विदर्भात, मराठवाड्यात २,६३९ कोटी, नाशकात ४५० कोटी, पुण्यात ७२१ कोटी, कोकणासाठी १०४ कोटी असे पॅकेज राज्य सरकारने घोषित केल्याचे ते म्हणाले.



 मात्र विरोधकांनी केंद्राला मदत करावी म्हणून शाई सुद्धा खर्च केली नाही असा टोला वडेट्टीवारांनी लगावला. 


केवळ विरोधासाठी विरोध करू नका. शेतकऱ्यांची खरंच कणव असेल तर त्यांनी केंद्राला मदतीचे पत्र द्यावे असे देखील ते पुढे विरोधकांना उद्देशून म्हणाले.