प्रेशर कुकर, शिट्टी, आणि... महादेव जानकर, प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक चिन्हांचे वाटप
निवडणुक आगोयातर्फे राष्ट्रीय पक्षांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आहे.
Lok Sabha Election Symbols : सर्वच राजकीय पक्षांकडून लोसभा निवडणुकीची जय्यत तयारी आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरु होण्याआधीच निवडणुक आगोयातर्फे निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आहे. राष्ट्रीय पक्षांना चिन्ह वाटप झाले आहे. महादेव जानकर, प्रकाश आंबेडकर यांना निवडणूक चिन्ह मिळाले आहे.
रासपचे नेते महादेव जानकर शिट्टी चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. महादेव जानकर यांना शिट्टी हे चिन्ह मिळाले आहे. जानकर यांनी पहिल्या पसंतीच चिन्ह म्हणून शिट्टी चिन्ह मागितलं होतं. तर दुसऱ्या पसंतीचे चिन्ह म्हणून सफरचंद या चिन्हाचे मागणी केली होती. तर, रोड रोलर या चिन्हाला तिसऱ्या क्रमांकाची पसंती दिली होती, निवडणुक विभागाने महादेव जानकर यांना पहिल्या पसंतीच शिट्टी हे चिन्ह दिले आहे. यामुळे परभणी लोकसभा मतदारसंघात महायुतीचं शिट्टी हे चिन्ह असणार असून आता गावागावात शिट्टीचा निनाद घुमणार आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला लकी ड्रा पद्धतीने मिळाले चिन्ह
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी आणि इंडियन नॅशनल लीगचे उमेदवार नजीब शेख यांनी केली होती गॅस सिलेंडर चिन्हाची मागणी केली होती. मात्र ड्रॉ पद्धतीने नजीब शेख यांना गॅस सिलेंडर चिन्ह तर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला प्रेशर कुकर ही निशाणी मिळाली आहे.