योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : अलीकडच्या काळात घटस्फोट होण्याचे प्रमाण(Divorce rates) वाढले आहे.  नाशिक(Nashik) जिल्ह्यांतील मागच्या पाच वर्षांतील घटस्फोटाची आकडेवारी कुटुंब व्यवस्थेला हादरवून टाकणारी आहे. जवळपास दहा हजाराहून अधिक जोडपी एकमेकांपासून विभक्त झाल्याचे समोर आले आहे. यांच्या घटस्फोटाचे कारण देखील धक्कादायक आहे. मोबाईलमुळे(mobile phones) या जोडप्यांचा काडीमोड झाला आहे.


मोबाईल फोनमुळे संसार तुटू लागले 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कौटुंबिक आणि वैयक्तीक कारणामुळे अनेक जोडप्यांमध्ये वाद होतात आणि विषय घटस्फोटापर्यंत पोहचतो. मात्र, आता मोबाईल फोनमुळे संसार तुटू लागले आहेत.   नाशिक शहरात दिवसेंदिवस घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहेत. हल्लीची पिढी मोबाईलच्या आहारी गेली आहे. आता हेच मोबाईलफोन घटस्फोटाचे कारण ठरत आहे. सर्वांनाच मोबाईलच  व्यसन जडल आहे. काम, मुलं, कुटुंब यापेक्षा मोबाईलला अधिक वेळ दिला जात आहे. यातूनच कौटुंबिक वाद निर्माण होत आहेत. मोबाईलमुळे घटस्फोटांचे प्रमाण वाढल्याचे समुपदेशकांचे म्हणणं आहे. 


फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युबमुळे वाद


गेल्या पाच वर्षात नाशिकच्या कुटुंब न्यायालयामध्ये दाखल झालेल्या घटस्फोटांचे खटले हे सर्व समाज माध्यमांच्या अतिवापराचे परिणाम आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब वर सातत्याने सर्फिंग करत राहिल्याने पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होताना दिसतात. 


चॅट आणि मोबाईलला पासवर्ड ठेवल्यामुळेही भांडण


रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर चॅट करणे त्यातच मोबाईलला पासवर्ड लावल्याने अनेक संशय पती-पत्नीमध्ये वाद निर्माण होताना दिसतात. त्याचे परिणाम कुटुंब न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी केसेस दाखल करण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या पाच वर्षात नाशिक कुटुंब न्यायालयामध्ये 50% वरून अधिक केसेस या विषयाशी संबंधित आहेत