साताऱ्यात दिवाळीत बाजारपेठा सजल्या
साताऱ्यातही दिवाळीची खरेदी जोरदार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
सातारा : दिवाळीचा उत्साह देशभरात पहायला मिळत आहे. साताऱ्यातही दिवाळीची खरेदी जोरदार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.
सातारा शहर परिसरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची झुंबड पाहायला मिळत आहे. लक्ष्मीपूजनासाठी लागणा-या केरसुणी, विविध रंगातील आकारातील आकाशकंदील, पणत्या, रांगोळीचे रंग, रेडीमेड फराळ, किराणा साहित्यासह, कपडे अशा विविध वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
इथल्या बाजार पेठेत विविध वस्तू दिसून येत आहे. रांगोळीतही अनेक रंग नव्याने आलेत. पणत्यांमध्येही बरीच व्हरायटी असून हल्ली आकर्षक डिझाईनमधल्या कँडल्सही मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत. नोकरदार महिलावर्ग मोठ्या संख्येने असल्यानं रेडीमेड फराळ खरेदीसाठी साताऱ्यात महीला मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या आहेत.