पुणे : दिवाळी आणि दिवाळी अंकांचं नातं घट्ट असून या दिवाळी अंकांना गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र दिवाळी अंकाच्या या इतिहासात पहिल्यांदाच समाज विधायक कार्यासाठी म्हणून दिवाळी अंकाची निर्मिती करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुबेर नावाच्या या दिवाळी अंकाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जवळपास दीड हजार लोकांचा समावेश असलेल्या फेसबुक सारख्या सोशल मिडीयावर अॅक्टिव असलेल्या ग्रुपने हा अंक काढला आहे. 


फेसबुकवरच्या या ग्रुपमध्ये तात्याराव लहानेंपासून संगीतकार सलील कुलकर्णी यांचाही समावेश आहे...तर अशा प्रकारे समाज विधायक कार्यासाठी दिवाळी अंकाची निर्मीती करुन साहित्यविश्वात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.