उदयनराजे भोसले यांना चंदक्रात पाटील यांचा टोला
गणेशोत्सवात मोठ्याने डीजे आणि डॉल्बी लावणारच असे ठणकावून सांगणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रात पाटील यांनी टोला लगावला आहे.
सातारा : गणेशोत्सवात मोठ्याने डीजे आणि डॉल्बी लावणारच असे ठणकावून सांगणाऱ्या खासदार उदयनराजे भोसले यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंदक्रात पाटील यांनी टोला लगावला आहे. डीजे, डॉल्बीच्या तालावर नाचायचं असेल तर खुशाल मोकळ्या मैदानावर नाचा, अशा शब्दांत पाटल यांनी सुनावलंय. तसंच डीजेवर भजन लावण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय.
खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा पोलिसांना आव्हान दिले होते. आता त्यांनी शहरातल्या मंगळवार तळ्यात गणेश विर्सजन करण्याचा आग्रह धरला असून आपल्याला कुणीही अडवू शकत नाही, असा पवित्रा घेतला. पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या तलावामध्ये विसर्जनाची परवानगी आधीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली होती. मात्र नवे अधीक्षक पंकज देशमुख हे स्वतः चर्चेत येण्यासाठी बंदी घालत असल्याचा आरोप उदयनराजेंनी केला. मंगळवार तळं हे आपल्या मालकीचं असल्याचाही त्यांचा दावा आहे. कोर्टाचा अवमान झाला तरी मंगळवार तळ्यातच विसर्जन होईल, असंही उयनराजे म्हणाले होते. तसेच डीजे लावण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे आव्हान दिल्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी हा टोला लगावलाय.
दरम्यान, साताऱ्यामधील मंगळवार तळ्यात गणपती विसर्जन करण्याच्या मुद्द्यावरून उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले आमनेसामने आले आहेत. उदयनराजे यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत स्थानिक जनतेला मंगळवार तलावात विसर्जन करण्याचे आवाहन केले होते. मात्र, उदयनराजेंची ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप शिवेंद्रराजे यांनी केला.
उदयनराजे भोसले यांनीच २०१५ मध्ये या तळ्यात गणेश मुर्तींचे विसर्जन करू नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. मात्र, आता त्यांच्या भूमिकेत अचानक बदल कसा काय झाला, असा सवाल शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केला.