शाळांनी भिकेचा वाडगा घेऊन सरकारकडे येऊ नये - प्रकाश जावडेकर
शाळांनी सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येवू नये, असे धक्कादायक विधान प्रकाश जावडेकर यांनी केलेय.
पुणे : शाळांनी सरकारकडे भिकेचा वाडगा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे असं वादग्रस्त विधान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलंय. शुक्रवारी पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आपल्या शाळेला किंवा महाविद्यालयाला मदत करणं हे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्य असल्याचंही जावडेकरांनी नमूद केलंय. सरकारकडे येणार आणि भिकेचा वाडगा घेऊन आम्हाला मदत करा. मदत करा असं सांगणार, अरे मदत तर आपल्या घरातच आहे. आपले जे माजी विद्यार्थी आहे, त्यांचीही जबाबदारी आहे. आमची शाळा आमचं कॉलेज याच्यासाठी काहीतरी करणं ही समाजात नवी भावना तयार खूप गरजेचं आहे, असा उपदेशाचा डोस पाजला.