शिरुर, पुणे : शिवाजी आणि संभाजी महाराज यांचं आपण सातत्याने नाव घेतो पण प्रत्यक्षात वागताना जात - पातीमध्ये आणतो. कोणी कितीही प्रयत्न केले तरी जाती-पातीत अडकू नका. दोनच गोष्टी माना एक बाबासाहेबांचं सविंधान आणि दुसरी भारत' असे परखड मत मांडले आहे, शिवसेना चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष अभिनेता सुबोध भावे यांनी. सुबोध भावे याने डॉ. अमोल कोल्हे यांना जोरदार टोला लगावला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराची सांगता आज अखेरच्या दिवशी जुन्नर आणि मंचर येथे झाली तेव्हा भावे यांनी दोनी ठिकाणी आपली ही भूमिका मांडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


डॉ अमोल कोल्हे यांचे नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून घोषणा झाली तेव्हा शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे असा जातीपातीचा सामना शिरूर लोकसभा मतदार संघात रंगला आहे. जाती भोवती संपूर्ण मतदारसंघात उलट सुलट चर्चाही रंगल्या आणि शेवटी सुबोध भावेना बोलावून जाती पातीचे रंग सौम्य करण्यात आला.


यावेळी  शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीकेचे लक्ष केले. ते म्हणाले 'माझी लढाई अमोल कोल्हे यांच्याशी नाही. माझी लढाई दिलीप वळसे पाटलांशी आहे, असे सांगत खूप काही केले आहे. खूप काही करायचेय, या दिलीप वळसे-पाटील यांच्या घोषणेचा त्यांनी समाचार घेतला.