डोंबिवली : सोसायटीच्या थकबाकीच्या वादातून चार ते पाच जणांनी एका डॉक्टरला स्टंप आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोंबिवली पूर्वेतील रामनगर परिसरात असलेल्या समर्थ पॅलेस इमातीत घडली. मारहाण करण्या-यांमधील काही जण लाकडी दांडके घेऊन पळताना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झालेत. या हल्ल्यात डॉ. देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 


याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय. पोलिसांनी वसंत म्हात्रे, आशा म्हात्रे आणि इतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. आश्चर्याची बाब म्हणजे पोलिसांनी याप्रकरणी वसंत म्हात्रे यांच्या पत्नीच्या तक्रारीवरून डॉ. देशमुख यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केलाय.