शॉवरमध्ये करंट उतरल्याने डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यु
नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात एका डॉक्टरचा अतिशय दुर्दैवी मृत्यु झालाय.
नाशिक : नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात एका डॉक्टरचा अतिशय दुर्दैवी मृत्यु झालाय.
काय झालं नेमकं?
डॉ. आशिष विलास काकडे हे आंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा शॉवरमध्ये करंट उतरून मृत्यु झाला आहे. सोमवारी सकाळच्या सुमाराला त्यांच्या बाथरूमधून पाणी बाहेर आले ते संपूर्ण इमारतीत पसरले. त्यानंतर ही बाब लक्षात आली.
इमारतीतल्या नागरिकांची धाव
इमारतीतल्या नागरिकांनी त्यानंतर काकडे यांच्या घराकडे धाव घेतली. डॉक्टरांच्या अंगावर भाजल्याच्या खुणा आढळल्याने हा संपूर्ण प्रकार लक्षात आला.