पुणे : मांत्रिकास बोलावून रुग्णावर मंत्रोपचार करणाऱ्या डॉक्टर सतीश चव्हाणला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात ही घटना १३ मार्च रोजी उघड झाली होती. याप्रकरणी सतीश शाहुराव चव्हाण या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याची २ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.


मांत्रिकाला यापूर्वीच अटक


उतारा करणारा मांत्रिक सचिन सदाशिव येरवडेकर याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. हा सर्व प्रकार २० फेब्रुवारी ते ११ मार्च दरम्यान स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडला होता. संध्या गणेश सोनवणे हीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.