सलमान खानच्या चित्रपटातून डेब्यू केल्यानंतर सुपरहिट ठरली 'ही' अभिनेत्री, वयाच्या 16 वर्षी इतक्या कोटींची मालकिण

Harshaali Malhotra  Net Worth:  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार हे बाल कलाकार म्हणून येतात. खूप कमी बाल कलाकार प्रसिद्ध होतात. सलमान खानसोबत पहिला चित्रपट करणारी या चिमुकलीने प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही ती सोशल मीडियावर चर्चेत असतं. 

Jun 03, 2024, 17:53 PM IST
1/7

बजरंगी भाईजानमधील मुन्नी म्हणजे हर्षाली मल्होत्राचा आज 16 वा वाढदिवस आहे. मुंबईतील पंजाबी कुटुंबात तिची जन्म झाला. 2015 मधील कबीर खानचा बजरंही भाईजान सुपरहिट ठरला होता. खूप कमी लोकांना माहितीय की ती 2 वर्षांची असताना बालकलाकार म्हणून तिने करिअरला सुरुवात केली. 

2/7

या चित्रपटासाठी हर्षालीला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर अर्वाड मिळालं होतं. त्यासोबत सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा स्क्रीन अवॉर्डही तिने पटकावलाय.

3/7

त्यानंतर तिला 2022 मध्ये भारतरत्न डॉ. आंबेडकर पुरस्कारानेही सन्मानित केलंय. हर्षाली चित्रपटाशिवाय टीव्ही शो आणि मालिकांमध्येही काम करते. 2015 मध्ये सोनी टीव्हीच्या लोकप्रिय नाटक जोधा अकबरमध्येही ती दिसली होती.

4/7

बजरंगी भाईजानमधील मुन्नीसाठी 1000 हून अधिक मुलींनी ऑडिशन दिलं होतं. त्यामधून हर्षालीची निवड झाली. बजरंगी भाईजाननंतर तिने चित्रपटातून अभ्यासासाठी ब्रेक घेतला होता. नुकतीच तिने 10 वीची परीक्षा दिली ज्या तिला 83 टक्के मार्क मिळालेत. 

5/7

प्रेम रतन धन पायोमध्ये तिला कास्ट करण्यात आलं होतं. पण काही कारणामुळे तिला शेवटच्या क्षणी वगळण्यात आलं. हर्षाली सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे इंस्टाग्रामवर 3.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. 

6/7

हर्षालीने संजय लीला भन्साळी यांच्या 'हीरामंडी' या वेब सीरिजमधील एका गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. 'एक बार देख लिए' गाण्याच्या या व्हिडीओतील तिचा अभिनय पाहून चाहते तिचं कौतुक होतंय. 

7/7

तिने सोशल मीडियावर हॅप्पी बर्थडे कतरिना आंटी अशी पोस्ट केली होती. त्यावेळी आंटी या शब्दामुळे ती ट्रोल झाली होती. हर्षालीची संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर 11 दशलक्ष डॉलर्स इतकी संपत्ती आहे.