सावकारानं रिक्षा उचलून नेल्यामुळे रिक्षाचालकाचा मृत्यू

सावकाराने रिक्षा उचलून नेल्याचा आघात सहन न झाल्यानं हृदयविकाराचा झटका येऊन रिक्षाचालकांचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडलीये.
डोंबिवली : सावकाराने रिक्षा उचलून नेल्याचा आघात सहन न झाल्यानं हृदयविकाराचा झटका येऊन रिक्षाचालकांचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीत घडलीये. याप्रकरणी पोलिसांनी सावकाराच्या साथीदाराला अटक केली असून सावकाराचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे डोंबिवलीत हळहळ आणि संताप व्यक्त होतोय. मंदार लाड असं या घटनेत मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचं नाव असून तो डोंबिवलीच्या आयरे गाव परिसरात वास्तव्यास होता.
भाड्याची रिक्षा चालवून तो त्याची पत्नी आणि मुलं यांचा उदरनिर्वाह करत होता. काही महिन्यांपूर्वी मंदारने त्याचा मित्र चाफळे याच्या माध्यमातून एका सावकाराकडून १० हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक चणचण असल्यानं तो या कर्जाचं व्याजही देऊ शकला नव्हता. या सगळ्या प्रकारामुळे मंदारच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून सा