Dombivli MIDC Blast : 23 मे 2024 हा दिवस डोंबिवलीकर आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवाणरा ठरला. डोंबिवलीतल्या एमआयडीसमधल्या एका केमिकल कंपनीत रिअॅक्टरचा स्फोट (Dombivli Blast) झाला आणि यात तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला. या स्फोटात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्यापैकीच एक खाणविलकर कुटुंब. डोंबिवलीत राहणाऱ्या रिद्धी अमित खानविलकर (Riddhi Khanvilkar) यांनाही या स्फोटात प्राण गमवावा लागला. डोंबिवलीतल्या रामचंत्र नगर नवमाऊली सोसाटीत राहाणाऱ्या हसत्या खेळत्या खानविलकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील सून रिद्धी कामावर गेल्या पण कधीच न परतण्यासाठी.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिद्धी खानविलकर परतल्याच नाहीत
अमित खानविलकर हे पालघरलमधल्या एका पॅथॉलॉजीमध्ये काम करतात. तर त्यांची पत्नी रिद्धी अमित खानविलकर या डोंबिवलीतल्या एमआयडीसीमधल्या एका कंपनीत काम करत होत्या. गुरुवार सुट्टी असल्याने अमित घरीच होते, तर रिद्धी कामावल गेल्या होत्या.  नेहमीप्रमाणे सर्व काही सुरळीत सुरू होत. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं 


ब्लास्ट झाला आणि डोंबिवली हादरली
गुरुवारी दुपारच्या सुमारत डोंबिवली एमआयडीसीमधल्या अमुदान केमिकल कंपनीत रिअॅक्टरचा भीषण स्फोट झाला आणि संपूर्ण डोंबिवली हादरली. स्फोटाच्या आवाजाने दोनशे मीटर परिसरातील इमारतीच्या काचाही फुटल्या. स्फोटाचा आवाज खाणविलकर राहात असलेल्या इमारतीपर्यंतही पोहोचला. आवाजने अमितच्या ह्रदयाचे ठोके वाढले. नेमकं काय घडलं याची त्याने माहिती घेतली. त्यावेळी एमआयडीसीत एका कंपनीत स्फोट झाल्याचं त्याला कळलं. ही गोष्ट ऐकताच अमितच्या डोळ्यासमोर अंधारी पसरली, आपली पत्नी तिथेच काम करत असल्याने त्याला पत्नीची काळजी वाटू लागली.


रिद्धीला अनेक फोन केले पण...
अमितने ताबडतोब आपल्या पत्नीला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण फोनही लागत नव्हता. त्यामुळे घाबरलेल्या अमितने आपल्या मित्रमंडळींना आणि नातेवाईकांना कळवलं. सर्वांनी अमितला धीर देत रिद्धीची शोधाशोध सुरु केली. तिचे फोटो सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करण्यात आले. आसपासच्या रुग्णालयांमध्येही शोध घेतला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना फोटो दाखवत शोधाशोध सुरु केली. यादरम्यान अमिच्या एका मित्राला एका डॉक्टरचा फोन आला. रुग्णालयात चार मृतदेह आणण्यात आले असून यातील दोन मृतदेह महिलांचे असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.


अमित आणि त्याच्या मित्रांनी तात्काळ डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रुग्णालयात धाव घेतली. पण दोन्ही मृतदेह संपूर्ण जळालेल्या अवस्थेत होते, त्यामुळे त्यांची ओळख पटत नव्हती. पण तितक्यात अमितची नजर एका मृतदेहाच्या हातावर पडली. आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हातातली अंगठी आणि गळ्यातलं मंगळसूत्र पत्नी रिद्धीचं असल्याचं त्याने ओळखलं आणि त्याच्या अश्रुंचा बांध फुटला. रुग्णालयताच तो कोसळला, मित्र आणि नातेवाईकांना त्याला कसंबसं सावरलं. आपली पत्नी या जगात नाही या कल्पनेचं अमित पार कोलमडून गेला होता. रिद्धीच्या अचानक जाण्याने संपूर्ण खानविलकर कुटुंबाला मोठा धक्का बसलाय.


डोंबिवलीत झालेल्या स्फोटात अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत कुणाची पत्नी कुणाचा मुलगा तर कुणाचा पती कुणाचा मित्र या घटनेमध्ये कायमचे निघून गेलेत.