औरंगाबाद : जायकवाडी धरणाचे एकूण १८ दरवाजे मध्यरात्री उघडण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे, तब्बल ९ वर्षानंतर जायकवाडी धरण ९६ टक्के भरलंय. त्यामुळे सुमारे १० हजार क्युसेक पाण्याचा गोदावरीच्या नदीपात्रात विसर्ग सुरु झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे गोदेकाठच्या शेकडो गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पण, आनंदाची गोष्ट म्हणजे या पाण्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यातल्या मोठ्या परिसराची तहान वर्षभरासाठी भागणार आहे. शिवाय शेती, उद्योग सगळ्यांना पाण्याचा व्यवस्थित पुरवठा करता येणार असल्यानं सगळीकडे समाधानाचं वातावरण आहे. 


जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पाण्याची आवक चांगली सुरु असल्याने ११.०० वाजता पाणी सोडण्याचा वेग वाढवण्यात येणार आहे. यानंतर दुप्पट वेगानं पाणी सोडण्यात येणार आहे.