मावळ : चारित्र्याच्या संशयावरून पत्नी, मुलगा, मुलगी आणि पत्नीच्या प्रियकरावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात पत्नी आणि मुलाचा मृत्यू झालाय. वडगाव मावळमधल्या कान्हाफाटा गावात ही घटना घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसंत गोपाळ सातकर यानं चारित्र्याच्या संशयावरून 38 वर्षीय पत्नी रजनी, 13 वर्षीय मुलगा अनुष, 9 वर्षीय मुलगी श्रावणी आणि गणेश आंबेकर यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केले. यात पत्नी आणि मुलाचा गळा चिरल्यानं मृत्यू झालाय. तर मुलगी आणि गणेश गंभीर जखमी झालेयत. 


गणेश आणि रजनीमध्ये प्रेमसंबंध असल्याचा वसंतला संशय होता म्हणून त्यानं हे कृत्य केलंय. आरोपीला वडगाव पोलिसांनी अटक केलीय.  मावळ भागात अशा प्रकारे चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि मुलांची हत्या करण्याची 15 दिवसातली ही दुसरी घटना आहे. 


26 जूनला लोणावळ्यात एका व्यक्तीनं याच कारणावरून पत्नी मुलगा आणि मुलीवर जीवघेणा हल्ला करून आत्महत्या केली होती. यात सुदैवानं मुलगा बचावला.