COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर : मार्गदर्शक आणि खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांची, नागपुरातील आयआयएम दीक्षांत समारोहात प्रमुख उपस्थिती होती, यावेळी डॉ. सुभाष चंद्रा यांनी युवकांना मार्गदर्शन केलं, आपल्या १० मिनिटाच्या भाषणात सुभाष चंद्रा यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना सुभाष चंद्रा म्हणाले, वर्तमानात जगा, यामुळे योग्य निर्णय घेण्याची तुमची क्षमता वाढेल. भुतकाळात जगण्यापेक्षा वर्तमानाचा विचार करून जगण्याचे फायदे अधिक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.


प्रतिभा आणि टॅलेन्ट प्रत्येक व्यक्तीत आहे, फक्त त्यांना ते ओळखता आलं पाहिजे, असं देखील यावेळी डॉ. सुभाष चंद्रा यांनी यावेळी सांगितलं.


आपण सर्व युवा आहात, तुम्हाला अनेक आव्हानं समोर असतील. आपल्या वरचा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका, प्रचंड आत्मविश्वास ठेवा, जे कराल त्यावर प्रचंड विश्वास ठेवा, आणि तुम्हाला जे मिळवायचं आहे, त्यासाठी सर्व करा, तुम्हाला यश देखील मिळेल, असं खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी यावेळी सांगितलं.


मात्र यश म्हणजे पैसा मिळवणं म्हणजे सर्व काही असं तुम्हाला वाटत असेल, तर आपल्या आत डोकावा, जग तुम्हाला शाबासकी देईल, पण थोडं अपयश आलं की, आपण दुसऱ्यांना दोष देतो, आपण तेव्हा म्हणतो, मी कधी कुणाचं वाईट केलं नाही, चुकलो नाही, मग माझ्यासोबत असं का झालं, तेव्हा तुमची चूक जरूर समजून घ्या, आणि यावेळी तुमच्या संस्कारांचं अवलोकन नक्कीच करावं लागेल, असं मार्गदर्शक आणि खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांनी सांगितलं.