Mhada Lottery 2023 : म्हाडा लॉटरीसंदर्भातील मोठी बातमी; स्वत:चं घर घ्यायचंय? हा गुरुवार चुकवू नका
Good News : आता हक्काच्या घराचा शोध थांबणार, म्हाडानं ठरवल्याप्रमाणं वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्यासाठी आणलीये खास भेट; ड्रीम होमचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार...
Mhada Lottery 2023 : (inflation) महागाईनं उच्चांक गाठलेला असला तरीही सर्वसामान्य मात्र त्यांच्या हक्क्याच्या घराचं स्वप्न (Dream home mumbai) पाहणं सोडत नाहीत. नव्या वर्षात तरी मी घर घेणारच, असाच निर्धार तुमच्यापैकी अनेकांनीच केला असेल. या स्वप्नांना पूर्णत्वास नेण्यासाठी हातभार लावणार आहे ते म्हणजे म्हाडा (mhada). दिल्या शब्दाला जागत नव्या वर्षात म्हाडा तुम्हाला हक्काचं घर मिळवून देण्यासाठी सज्ज झालं आहे. ज्यासाठी तुम्हाला येणारा गुरुवार चुकवायचा नाहीये. कारण, म्हाडाच्या घरांसाठीची नोंदणी सेवा गुरुवारपासून सुरु होणार आहे.
5 जानेवारी महत्त्वाचा दिवस
म्हाडाच्या मुंबई मंडळासाठी यापुढं कायमस्वरूपी नोंदणी प्रक्रिया अंमलात आणली जाणार असून, अर्जदारांना आता एकदाच अर्ज केल्यास म्हाडाच्या कोणत्याही मंडळाच्या सोडतीसाठी अर्ज करता येणार आहे. सदरील नोंदणी प्रक्रिया गुरुवार, 5 जानेवारीपासून सुरु होणार आहे. (Mhada Lottery online process)
हेसुद्धा वाचा : होम लोन घेणाऱ्यांनो सर्वात मोठी बातमी: वाचतील व्याजाचे लाखो रुपये, जाणून घ्या सोपी ट्रिक
बदलत्या तंत्रज्ञानाच्या साथीनं आता म्हाडानंही नोंदणी प्रक्रियेमध्ये सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला. यामध्ये जवळपास सर्वच प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. या प्रक्रियेमध्ये अर्ज करताना अर्जदारांनी नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करणं अपेक्षित असेल. ज्यानंतरच अर्जदार सोडतीसाठी पात्र ठरतील. सोडतीमध्ये नाव येणाऱ्या अर्जदारांना घराचा तात्काळ ताबाही मिळणार आहे. मुख्य म्हणजे या सोडतीसाठी कुणीही नोंदणी करु शकणार आहे. (Mhada Lottery 2023 online form)
कधी करावा अर्ज? (How to apply for Mhada Lottery )
अमुक एका ठिकाणी घर घेण्यासाठीची सोडत जाहीर झाल्यानंतर अर्जदारांनी अर्ज करत पुढील प्रक्रीया पूर्ण करावी. नव्या नियमांनुसार नोंदणी करतानाच अर्जदारा (इच्छुक) पॅनकार्ड (Pancard), आधारकार्डसह (adhar card) उत्पन्नाचा दाखला आणि निवास दाखला सादर करावा लागणार आहे. तर, सामाजिक आणि इतर आरक्षित वर्गातील अर्जदारांनी सदरील प्रमाणपत्र, जातीचा दाखला सादर करावीत.
एका दिवसात घराची चावी कसं शक्यंय?
घर मिळताच विजेत्यांना देकार पत्र मिळाल्यानंतर त्यांनी घराची संपूर्ण रक्कम भरल्यास अशा विजेत्यांना एका दिवसात घराची चावी मिळणार आहे. दरम्यान सोडतीसाठीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होणार असून, फक्त घराची चावी आणि कराराच्या कारणानंच इच्छुकांना म्हाडाच्या कार्यालयात जावं लागणार आहे.