मुंबई : पुढच्या वर्षी जुलै महिन्यात देशातील सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशात वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्र एकसारखेच असणार आहेत. त्यांचा रंग आणि वैशिष्ट्य एकसारखीच असणार आहेत. वाहन परवाना आणि वाहन नोंदणी प्रमाणपत्रात मायक्रोचीप आणि क्यूआर कोडसुद्धा असणार आहेत.


कार्डद्वारे सर्व माहिती 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहन परवाना आणि नोंदणी प्रमाणपत्र हे मेट्रो आणि एटीएम कार्डसारखे नियरफील्ड कम्युनिकेशन असणार आहेत.


वाहतूक कोंडीसंदर्भात कोणतीही माहिती किंवा सूचना या नव्या कार्डद्वारे लवकर मिळू शकतील.


प्रदुषण नियंत्रणासंदर्भात सर्व माहिती ही आरसी बुकमध्ये असणार आहे.


रस्ते व परिवहन मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने या संदर्भात माहिती दिलीय.