सातारा : शासकीय कर्मचाऱ्यांनी मनावर घेतले तर काय चमत्कार घडू शकतो याचं उत्तम उदाहण म्हणून साताऱ्यातल्या कराड आरटीओ कार्यालयाचं उदाहरण देता येईल. या आरटीओ कार्यालयात फक्त एका तासात ड्रायव्हिंग  लायसन्स मिळत  आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कराड उप प्रादेशिक परिवहन विभागाचे आरटीओ अजित शिंदे यांनी कराड पॅटर्न राबवत, राज्यातले पहिले झिरो पेंडिंग आरटीओ कार्यालय सुरु केले आहे. सातारा जिल्ह्यात २०११ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडसाठी स्वतंत्र आरटीओ कार्यालय सुरु केले.


हेच उप प्रादेशिक कार्यालय आता राज्याला दिशादर्शक ठरत आहे. वाहन नोंदणी असो, अथवा नवीन परवाना काढणे असो, अगदी काही मिनिटांतच हे काम आता कराड आरटीओ कार्यालयात शक्य झाले आहे. यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा दोन्हींचीही बचत होत आहे.