धुळे : धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात पाण्याअभावी प्रत्येक सिंचन प्रकल्प महत्वाचा झालाय. नंदूरबार तालुक्यातील पूर्व पट्टा पर्जन्यछायाचा प्रदेश म्हणून याची ओळख या भागाच्या पाचवीलाच दुष्काळ पुजलेलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या परिस्थितीवर मात करण्यासाठी अमरावती नाल्यावर मध्यम प्रकल्प उभारण्यात आला. त्याचं काम २००४ मध्ये पूर्ण झालं. त्यानतर फक्त २००५ एकदा हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला मात्र त्यानंतर तब्बल १२ वर्षांपासून या धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे. या भागात सातत्यानं पडणाऱ्या दुष्काळामुळे या भागातील शेतकरी मेटाकुटीस आलाय. 



शासनानं कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेलं धरण या भागातील शेतक-यांसाठी आशेचा किरण आहे. या धरणामुळे या भागातील जवळपास ५०० हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे तरी शासनाने लक्ष घालून तापी नदीतून उपसा सिंचन योजना कार्यन्वित करून धरणात पाणी सोडून या भागातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.