शशिकांत पाटील, झी मीडीया, लातूर : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहर हे नेहमीच तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत असतं. त्यात उन्हाळ्यात अहमदपूर शहरातील पाणीप्रश्न अधिकच पेटला आहे. अहमदपूर नगरपालिकेतर्फे शहराला ३० ते ३५ दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. मुळात अहमदपूर शहरापासून १५ किमी अंतरावर लिंबोटी धरण आहे. मात्र धरण उशाला आणि कोरड घशाला अशी शहर वासीयांची अवस्था झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदपूर शहरातील नगर पालिका आणि स्थानिक आमदार विनायकराव पाटील हे जबाबदार असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसने पालिकेवर घागर मोर्चा काढला. यावेळी अहमदपूर शहरातील महिला मोठ्या प्रमाणात घागर घेऊन नगर पालिकेवर धडकल्या. यावेळी नगर पालिका, स्थानिक आमदार आणि राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. लिंबोटी धरणात मुबलक पाणी असूनही लिंबोटी धरणातील पाणी सरकार का देत नाही असा सवालही यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी उपस्थित केला.