खुशखबर.. रशियाची Sputnik V पुण्यात तयार होणार...DCGI ची मंजुरी
पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला रशियामधील स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करण्यासाठी परवानगी मिळाली आहे.
मुंबई : कोरोना लसीसंदर्भात महत्वाची बातमी आहे. पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला रशियामधील स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. सीरम इंस्टीट्यूटने या संदर्भात डीसीजीआयकडे (Drugs Controller General of India) परवानगी मागितली होती. त्यानंतर डीसीजीआयने ही परवानगी दिली आहे. त्यामुळे आता पुण्यातील सीरम इंस्टीट्यूमध्ये स्पुटनिक लसीची निर्मिती केली जाणार आहे. यानंतर या लसीचं परीक्षण केलं जाणार आहे. सध्या डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज (Dr Reddys Laboratories) भारतात स्पुटनिक व्ही लसीची निर्मिती करत आहे. (Drugs Controller General of India has permited to serum institute for manufacture sputnik v vaccine)
सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने (serum institute of india) भारतात स्पुटनिक व्हीच्या उत्पादनाच्या परीक्षण परवान्यासाठीच्या परवानगी मागण्यासाठी डीसीजीआयकडे अर्ज केला होता. तसेच चाचणी परवानासाठीही मान्यता मिळावी, यासाठीही आवेदन केलं होतं.
सीरममध्ये सध्या ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राजेनेका (Oxford-AstraZeneca) द्वारे बनवण्यात आलेल्या कोव्हीशील्ड लसीची निर्मिती केली जात आहे. जूनमध्ये कोव्हीशील्डचे 10 कोटी डोस सरकारला पुरवणार असल्याचं सीरम इंस्टीट्यूटने याआधीच महटलं होतं. नुकतेच सीरमच्या वतीने गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवण्यात आले होते. त्या पत्रामध्ये म्हटलं होतं की, "कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. यानंतरही आमचे कर्मचारी 24 तास काम करत आहे. कर्मचारी नोवाव्हॅक्स (Novavax) लसीची निर्मिती करत आहे. नोवाव्हॅक्स लसीच्या उत्पादनासाठी अजूनही अमेरिकाकडून परवानगी मिळालेली नाही".
संबंधित बातम्या :
राज्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यात सातत्याने घट, दिवसभरात 20,852 रुग्णांची मात
पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांना अजितदादांकडून मोठा दिलासा, केली ही घोषणा