नागपूर : नव वर्षाच्या सेलिब्रशन दरम्यान 'ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह' करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांची करडी नजर राहणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी ३१ डिसेंबरच्या रात्री 'ड्रंक एन्ड ड्राईव्ह'च्या कारवाई करण्यात आलेल्यांना थेट आगाऊ नोटीसच धाडण्यात आल्यात... आहे की नाही एक पाऊल पुढे...


गेल्या वर्षी कारवाई करण्यात आलेल्या मद्यपींनी यावर्षीही तसेच वर्तन केल्यास कठोर कारवाईचा इशाराच पोलिसांनी नोटीशीतून दिला आहे. 


मद्यपी व स्टंटबाजांवर चाप बसाबा म्हणून शहरात सुमारे ८०० पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहे... तसेच कमला मिल कपाऊंडमधील आगीच्या दुर्घटनेनंतर नागपुरातही बार, हॉटेल्स, पब व सभागृहाच्या छतावरील तात्पुरते पंडाल उभारण्यास अग्निशमन विभागाने मनाई केली आहे.