अहमदनगर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पण पोलिसांची नजर चुकवून अनेक जण पर्यटनस्थळी गर्दी करत आहेत. पाऊस आणि विकेंडमुळे अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटकांची झुंबड उडाली आहे. अहमदनगरमधील भंडारदरा धरण परिसरातही पर्यटकांनी गर्दी केली आहे. यावेळी काही मद्यधुंद पर्टयकांनी पोलिसांवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भंडारदरा धरणात एक जण बुडाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तिथल्या पर्यटकांना जाण्यास सांगितलं. त्याचवेळी मद्यधुंद असलेल्या पाच जणांना पोलिसांशी वाद घालायला सुरुवा केली. यावेळी एका पोलिसाची नेम प्लेटही तुटली. त्यामुळे तिथलं वातावरण काही तणावपूर्ण झालं होतं. 


स्थानिक दुकानदारांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता पर्यटकांनी त्या दुकानदारालाही मारहाण केली. हा सर्व प्रकार पाहताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेतली आणि या पर्यटकांना पकडलं. यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवत हुज्जत घालणाऱ्या पर्यटकांना पोलीस ठाण्यात नेलं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.


पवना धरणात तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू


पवना धरणात पोहायला गेलेल्या एका तरुणाचा धरणाच्या जलाशयात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास वाघेश्वर मंदिर परिसरात घडली. शुभम दुधाळ असं या बुडालेल्या तरूणाचं नाव आहे. शुभम त्याचा भाऊ संकेत आणि सहा मित्रांसोबत रविवारी सकाळी तुंग इथं फिरण्यासाठी आला होता. त्यानंतर ते दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पवना धरण परिसरातील वाघेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी आले होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर ते पवना धरणात पोहण्यासाठी उतरले असता पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम पाण्यात बुडाला.