पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता तेरा मार्चला होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डी. एस. कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना शिवाजीनगर कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन  कोठडी सुनावली होती. एक मार्चला डीएसकेंना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर लगेचच डीएसकेंनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर कोर्टाने पाच तारखेला सुनावणी ठेवली होती.


सरकारी पक्षाने म्हणणं मांडण्यासाठी मुदत मागीतली. त्यावर कोर्टाने पुढील सुनावणी तेरा तारखेला ठेवली आहे.