पुणे : शहरातील बांधकाम व्यवसायिक डीएस कुलकर्णींवर गुंतवणूकदारांनी दिलेल्या तक्रारीनंतर सात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना बोलवले तेव्हा गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पुणे-सोलापूर महामार्गालगतचा ड्रीम सिटी प्रकल्प विक्रीला काढण्यात येणार असल्याचं डीएसकेंनी सांगितलं.


गुन्हा दाखल झाल्यानंतर डीएसकेंना पुणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे अन्वेशन विभागात बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी पोलिसांनी डीएसकेंना कडक शब्दात समज दिली आणि पैसे परत न केल्यास अटक करु, असा इशाराही दिला.


ड्रीम सिटी हा डीएसकेंचा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. मात्र आता ड्रीम सिटी विक्रीला काढली आहे. त्यासाठी एक अमेरिकन कंपनी पाहणी करण्यासाठीही येणार आहे. गुंतवणुकदारांचे पैसे परत न केल्याबद्दल डी. एस. कुलकर्णींविरोधात पोलिसांकडे सात तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या संदर्भात पोलिसांनी कुलकर्णी यांना चौकशीसाठी बोलवलेही होते. त्यामध्ये कुलकर्णी यांनी गुंतवणूकदारांचे पैसे लवकरच परत करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते.