डीएस कुलकर्णींची पत्नीसह पोलीस कोठडीत रवानगी
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयानं दिलेत.
पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती यांना १ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्याचे आदेश पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयानं दिलेत.
डीएसके पोलीस चौकशीला सामोरे जायला सक्षम आहेत, असा अहवाल ससून रुग्णालयानं दिला होता. त्या आधारावर न्यायालयानं त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीय.
न्यायालयीन कोठडीत असणारे डीएसके दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार घेत होते. हेमंती यांच्या तपासात तिजोरी मिळाली आहे, मात्र तिची चावी सापडलेली नाही. या तिजोरीत महत्त्वाची कागदपत्रं असण्याची शक्यता आहे.
'ड्रीम सीटी' प्रकल्पासाठी जमीन खरेदी करताना नातेवाईकांच्या नावे दीडशे कोटी रुपये वळवण्यात आले आहेत. त्याचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी हेमंती यांची पोलीस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.