डीएसकेंचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक डीएसके यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
पुणे : शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायीक डीएसके यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या फोटोत पती-पत्नी दिसत आहेत. आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात दोघांना अटक झालेली आहे. सध्या त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आलेली आहे. मात्र त्यापूर्वी ते जेव्हा पोलीस कोठडीत होते, तेव्हाचा हा फोटो असावा, असा अंदाज वर्तविण्यात आलाय.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचा असा फोटो काढून रेकार्डला ठेवण्याची पोलिसांची पद्धत आहे. असाच डीएसके आणि त्यांच्या पत्नीचा फोटो काढण्यात आला असावा. जो बघून कोण होतास तू काय झालास तू अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.