औरंगाबाद : नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी येण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकच्या दारणा आणि नांदूरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणाच्या बॅकवाटरमध्ये पोहचलं आहे. जवळपास एक टक्क्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.


सध्या मराठवाड्यात पाऊस नसल्यानं जायकवाडी धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस खाली जातो आहे. त्यामुळे या पाण्यानं दिलासा द्यायला सुरुवात केली आहे. सध्या 23 हजार 378 क्युसेक इतक्या वेगाने जायकवाडी धरणात आवक सुरु आहे. त्यामुळे आता १८ टक्के इतका पाणीसाठा धरणात झाला आहे. तर धरणात 17टक्के इतका जिवंत पाणीसाठा होता.