मुंबई : Covid19 cases in Maharashtra :  राज्यात गेल्या 24 तासांत वाढले 40 हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात 1 लाख 41हजार  492 कोरोना आणि 441 ओमायक्रॉनचे सक्रीय रुग्ण आहेत. त्यातच आता ऑक्सिजनची मागणी वाढ लागली आहे. (demand for oxygen in Maharashtra) त्यामुळे राज्य सरकार कोरोनाबाबतचे निर्बंध लागू करण्याची शक्यता आहे. आजच नवीन नियम जाहीर होण्याची शक्यता आहे. (Due to the increase in the number of corona patients, the demand for oxygen in Maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 महाराष्ट्रात  कोरोना संकट निर्माण झाल्याचे चित्र आहे. राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कोरोनाची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मुंबई आणि पुणे या दोन महानगरांत मोठ्या प्रमाणत कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. मुंबईबद्दल सांगायचे झाले तर, शुक्रवारी येथे 20971 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, 8490 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतही शुक्रवारी 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 1395 कोरोना रुग्ण अजूनही रुग्णालयात दाखल आहेत.  


कोरोनामुळे मुंबईतील 123 हून अधिक इमारती सील करण्यात आल्या असून सध्या येथे 6 कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रात सुमारे 364 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.  त्यामुळे आजपासून नवीन लागू होण्याची शक्यता आहे. मुंबईत कठोर नियम लागू करण्यात आले आहेत.



दरम्यान, संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. याअंतर्गत परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी सात दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक करण्यात येणार आहे. यासोबतच आठव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणीही आवश्यक करण्यात आली आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे आणि नवीन प्रकार पाहता आंतरराष्ट्रीय प्रवाशांवरील निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्राची ही मार्गदर्शक तत्त्वे 11 जानेवारीपासून लागू होणार आहेत.