मुंबई : गेल्या आठवड्यात पुण्यातील बालेवाडी भागातून अपहरण झाल्यानंतर आठ दिवसांनी चार वर्षीय स्वर्णव चव्हाण उर्फ डुग्गू सापडला. (swarnav chavan Kidnapped)  डुग्गू त्याच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर काही तासांनंतरच नांदेडहून त्याला भेटण्यासाठी आत्या सुनिता राठोड या निघाल्या. (Duggu swarnav chavan Kidnapped ) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाडका भाचा डुग्गुच्या ओढीने निघालेल्या आत्याचा अहमदनगर जिल्ह्यात पहाटे एका रस्ता अपघातात मृत्यू झाला. दुर्दैवी बाब म्हणजे आत्या आणि डुग्गूची ही भेट अधुरीच राहिली. आत्याचा या रोड अपघातात मृत्यू झाला आहे. 


सुनीता राठोड (३६) असे मृत महिलेचे नाव असून स्वर्णवचे वडील डॉ. सतीश चव्हाण यांची मोठी बहीण आहे. कार चालवत असलेला तिचे पती संतोष आणि समर (१४) आणि अमन (६) ही दोन मुले जखमी झाली. (अपहरण झालेला स्वर्णव कसा सापडला? अपहरणामागची इनसाईड स्टोरी) 


पोलिसांनी सांगितले की, अहमदनगर शहरापासून सुमारे 5 किमी अंतरावर असलेल्या पुलावर पहाटे 3 च्या सुमारास कारचा अपघात झाला.


स्वर्णवचे अपहरण करण्यात आले होते 


11 जानेवारी रोजी सकाळी 9.45 च्या सुमारास बालेवाडी परिसरातील सायकर बागेतून दुचाकीवरून पळून आलेल्या संशयितांनी स्वर्णवचे अपहरण केले होते.


स्वर्णवच्या वडिलांनी सोशल मीडियावर 'मागाल ते देतो, माझ्या काळजाच्या तुकड्याला सोडा' असं आवाहन अपहरणकर्त्यांना केलं होतं. अखेर नऊ दिवसांनंतर स्वर्णव चव्हाण  (Swarnav satish chavhan) हा चिमुरडा आपल्या आईच्या खुशीत सामावला.


अपहरणकर्ता असल्याचा संशय असलेल्या एका व्यक्तीने बुधवारी दुपारी पुनावळे येथील एका इमारतीत मुलगा आणि एक बॅग सोडली. पिशवीत मुलाच्या वडिलांचा संपर्क क्रमांक होता. स्थानिकांनी त्याच्याशी संपर्क साधून मुलाला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.