नागपूर : नागपूरकरांनो जर तुम्ही बासमती तांदूळ खात असाल तर सावधान.. कारण तुम्ही खात असलेला बासमती तांदूळ डुपलीकेटही असू शकतो.. होय नागपूरात पोलिसांनी एका आरोपीला अटक केलीय. स्वस्त तांदळाला बासमती तांदळाचा फ्लेवर लावून त्याची विक्री करत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागागानं बनवाट बासमती तांदळाचा भांडाफोड केलाय. याप्रकरणी एफडीएनं नागपूरच्या शांतीगर भागातून प्रदीप कंडू या तांदळाच्या व्यापा-याला अटक केलीये.. कंडू फ्लेव्हर असलेली पावडर स्वस्त तांदळात मिसळून त्याची बासमतीच्या नावाने विक्री करत होता.. गेल्या कित्येक दिवसांपासून त्याचा हा गोरखधंदा सुरु होता... मात्र अन्न आणि औषध प्रशासनाला याची माहिती मिळताच तातडीनं काररावाई करत त्यांनी आरोपीला रंगेहात पकडलंय.


आरोपी ही पावडर दिल्लीतून आणत होता.. त्यामुळे याच्यापाठी मोठं रॅकेट असल्याची शक्यता व्यक्त केली जातीय. आता ही पावडर आरोग्यास हानीकारक आहेका याचा तपास सुरु आहे. 


या प्रकरणातील आरोपी प्रदीप कुंडूचे सर्व संहिताय एफडीएनं जप्त केलंय. पण सर्व सामान्यांची फसवणूक करत त्यांच्या आरोग्याशी खेळणारे कायद्याच्या कचाट्यातून सुटता कामा नये याची खबरदारीदेखील आता या अधिकाऱ्यांनी घ्यायला हवी.