पुणे : आपण पोलीस अधिकारी झालो आहोत, असे पत्नीला भासवण्यासाठी एकाने पोलिसाचा ड्रेस परिधान केला. यानंतर जो घोटाळा व्हायचा तो झालाच, यामुळे ही कहाणी अधिक रंजक झाली. पत्नी बँकिंग परीक्षेसाठी पुण्यात आली होती. तिला आपण पोलीस अधिकारी असल्याचं संबंधित आरोपीने सांगितलं, यासाठी तो पोलीसाचा ड्रेस घालून बाहेर जात असे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र वानवडी पोलिसांचं लक्ष गस्ती दरम्यान संबंधित इसमावर गेलं. खांद्याला जो बॅच असतो, त्यावर म.पो. म्हणजेच महाराष्ट्र पोलीस ऐवजी म.पो.से. असा लोगो असल्याने पोलिसांना संशय आला. संबंधित पोलिसांनी त्याला विचारल्यावर आपण पोलीस निरीक्षक असल्याचं त्याने सांगितलं.


पेट्रोलिंग करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना वानवडीत साठे उद्यानाजवळ हा इसम दिसून आला. या पोलिसाकडे त्यांनी ओळखपत्राची मागणी केली, त्याच्याकडे ओळखपत्र दिसून आले नाही. लॉकडाऊनमध्ये आपण पोलिसात भरती झाल्याचं त्याने सांगितलं. या बदल्यात त्याने जी उत्तरं दिली ती खोटी असल्याचं समोर आलं.


भाऊसाहेब गोयकर असं आपलं नाव असल्याचं त्याने सांगितलं, भाऊसाहेब गोयकर असा बनावट पोलीस बनून का फिरतोय, असा प्रश्न पोलिसांना पडला, पोलिसांना त्याने आपण नकली पोलीस असल्याचं सांगितलं. हा व्यक्ती चाकणमध्ये राहतो आणि त्याचा फेब्रिकेशनचा व्यवसाय आहे. लॉकडाऊनमध्ये आपण पोलिसात भरती झाल्याचं खोटं त्याने आपल्या पत्नीला सांगितलं आणि ते खोटं खरं असल्याचं भासवण्यासाठी त्याला एवढा खटाटोप करावा लागला, पण घोटाळा झाला.


संबंधित व्यक्तीची पत्नी बँकिंग परीक्षा देण्यासाठी पुण्यात आली असताना, पोलिसाच्या गणवेशात रामटेकडी येथे पत्नीसोबत बँकिंग परीक्षेला आलो असल्याचं त्याने सांगितलं. पोलिसांनी त्याच्याकडून  पोलिसांचा गणवेश, मोबाईल, रोख रक्कम, मोटरसायकल असा २ लाख १५ हजार रुपयांचा रोख माल जप्त केला.