जळगाव : अंत्ययात्रेच्यावेळी मृत व्यक्तीला मानवंदना देण्यासाठी बंदुकीने हवेत दोन गोळ्या झाडल्यानंतर तिसऱ्या वेळी बंदूक लॉक होऊन अचानक गोळी सुटली. ही गोळी लागून अंत्ययात्रेत आलेल्या एका वृद्धाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पिंप्री गावात आज घडली. तुकाराम वना बडगुजर असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे.