नागपूर : Coronavirus कोरोना विषाणूने भारतात थैमान घालण्यास सुरुवात केल्यापासून स्थानिक आणि केंद्र प्रशासनाकडून सर्वत्र काही महत्त्वाचे उपाय योजण्यात आले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशव्यापी लॉकडाऊनची हाक दिली. अशा या परिस्थितीमध्ये सर्व व्यवहार ठप्प असल्यामुळे रस्त्यांवर, फुटपाथवर राहणारे बेघर, याचक यांच्या निवाऱ्याचा आणि त्यांच्या खाण्यापिण्याचा मोठा प्रश्नच उभा राहिला. पण, माणुसकी आणि सामाजिक भान जपणाऱ्या काही व्यक्तींनी हा भारही आपल्या खांद्यावर घेत, निवारा केंद्रांमध्ये या मंडळींना आसरा दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरमध्ये अशा सर्व बेघरांसाठी सुरु करण्यात आलेल्या निवारा केंद्रांमध्ये त्यांच्यासाठी राहण्याची, जेवणाची सोय करण्यात आली आहे. शिवाय एका चांगल्या जीवनशैलीच्या दिशेने चालण्यासाठी या प्रत्येकालाच प्रोत्साहित केलं जात आहे. नागपूर पालिकेच्या या अनोख्या उपक्रमाची सध्या सर्वदूर प्रशंसा सुरु आहे. या कल्पनेसाठी पुढाकार घेतला तो म्हणजे खुद्द पालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि काही स्वयंसेवी संस्थांनी. 


कोरोमुळे सुरु असणाऱ्या लॉकडाऊनच्या या काळात या बेघरांना स्वावलंबी करत शक्य असेल त्यांना या काळानंतर काही रोजगार उपलब्ध होऊ शकतो या दृष्टीने त्यांच्यातील कौशल्यही वाखाणली जात आहेत. 



फुटपाथवर राहणाऱ्या बेघरांना पाहिलं की, यांचं कसं काय भागत असेल असाच प्रश्न अऩेकांच्या मनात घर करुन जातो. पण, तो प्रश्न अनेकदा क्षणिक असतो. याच प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेत नागपूर पालिकेकडून पावलं उचलली गेली आहेत.  हजार २५२ जणांनी आसरा घेतला आहे. महापालिकेतर्फे त्यांचा चहा, नाश्ता आणि दोन वेळच्या जेवणआची मोफत सोयही करण्यात येत आहे. इतकंच नव्हे, तर या लोकांना स्वच्छ कपडेही देण्यात येत आहेत. आयुक्त तुकाराम मुंढे आणि स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारानं या लॉकडाऊनच्या काळात सुरु असणारा बेघरांचा ल़ॉकडाऊन खऱ्या अर्थाने प्रशंसेस पात्र ठरत आहे.