Pankaja Munde Dussehra Melava : दसरा मेळाव्यानिमित्ताने सावरगावातील  (Savargoan) भक्तीगडावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भाषण केलं. पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात (Dussehra Melava) आपल्या विचारांना मोकळी वाट करून दिली. गोपिनाथ मुंडेपासून (Gopinath Munde) सुरु झालेला संघर्ष कायम असल्याचं त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं. "हा मेळावा चिखल फेकणाऱ्यांचा नाही चिखल तुडवणाऱ्यांचा आहे. चिखल तुडवणं, संघर्ष करणं आमच्या रक्तातच आहे." असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर गदारोळ
पण पंकजा मुंडे यांचं भाषण संपल्यानंतर तुफान गदारोळ झाला. कार्यकर्ते आणि समर्थकांनी एकच गोंधळ घातला.यावेळ पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. पंकजा मुंडे यांचं भाषण ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. पंकजा मुंडे यांचं भाषण संपताच कार्यकर्त्यांनी मंचाजवळ धाव घेतली, त्यामुळे एकच गोंधळ उडाला. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे एकच गोंधळ झाला. पंकजा मुंडे यांनी समर्थकांना शांत रहाण्याचं आवाहन केलं. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात हा मेळावा शिस्तीचा आहे, सर्वांना शिस्त पाळावी असं आवाहन केलं होतं. पण काही कार्यकर्त्यांकडून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला.


पंकजा मुंडे यांचं भाषण
"कुणाचे जोडे उचलणाऱ्यांचं कधीच इतिहासात नाव झालेलं नाही. संघार्षाशिवाय नाव होत नाही. माझ्या अंगात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघणाऱ्या छत्रपती शिवरायांचे संस्कार, भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे यांचं रक्त आहे. मी संघर्षाला घाबरत नाही. मी थकणार नाही, कधीही कुणासमोर झुकणार नाही. कोणत्याही आगीतून नारळ काढायला घाबरत नाही", असं भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं. या वक्तव्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.