Earth Gulped Home: आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर: भूकंप येणं, जोरदार पावसाने पूर येणं, अगदी वादळं येणं आपल्यासाठी नवीन नाही. मात्र तुमच्या आसपास असलेलं घरचं पृथ्वीने पोटात घेतल्याची घटना घडली आहे का? तुम्ही असा धक्कादायक प्रकार पहिला आहे का?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूर शहरालगतच्या घुग्गुस येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कोळसा खाणींचा भाग असलेल्या या गावातील आमराई वॉर्डात एक उभं घर थेट सत्तर फूट खाली खचलं आहे. या गावात सर्वत्र असलेल्या भूमिगत कोळसा खाणींमुळे हा प्रकार झाल्याची चर्चा होतेय.


गजानन मडावी यांचे राहते घर अचानक हलू लागल्याने घाबरून जात घरातील सदस्य पडले बाहेर, काही क्षणातच अख्खे घर 70 फूट जमिनीत खचल्याने आसपासच्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. 


सरकारी कोळसा कंपनीच्या खाणीमुळे या परिसरात अनेकदा घरे पडल्याच्या घडल्या आहेत. मात्र, अशा पद्धतीने एकच घर 70 फूट गडप होण्याची ही धक्कादायक घटना प्रथमच उजेडात आली आहे.


घटनास्थळी महसूल- खाण प्रशासन आणि पोलिसांचं पथक झालं. यानंतर परिसरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. 



दरम्यान, नक्की हा प्रकार कशामुळे झाला याबाबत पुढील तपास सुरु आहे. 


earth gulped home horrible incident recorded in chandrapur of maharashtra