पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के
भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेत. धुंदलवाडी,दापचरी, चिंचले ,बोर्डी, झाई परिसरात आज पहाटे 4.45 वा आणि 6.45 वाजता पुन्हा भुकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तिव्रता २.९ रिस्टर स्केल इतकी होती. आतापर्यंत या परिसरात 7 ते 8 वेळा कमी अधिक प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पाहणीसाठी पथक
पहाटे अनेकजण घराबाहेर झोपल्यांना भूकंपाचे धक्के तीव्रतेने जाणवले आणि त्यांच्यामध्ये भितीचे वातावरण पसरले.
प्रशासनाने या भूकंपाची गंभीर दखल घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 11 ते 13 तारखे दरम्यान या भूकंपाची पाहणी करण्यास पथक येणार आहे.
तज्ज्ञांकडून पाहणी
दरम्यान भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या तज्ज्ञांचे पथक 11 ते 13 डिसेंबर दरम्यान या भागाचा दौरा करणार आहेत. जिल्हा प्रशासनानं तशी माहिती दिलीय... भूकंपाच्या धक्क्याने लोकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर व्हावी यासाठी लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आलाय.